देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. इतिहासात पहिल्यांदाच दहिहंडीच्या दिवशी मुंबईत शांतता, गोविंदा पथकांकडून सामाजिक उपक्रमांचं आयोजन; डीजे-गाण्यांऐवजी प्लाझ्मा दान


 

  1. अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर, उपचारासाठी लवकरच परदेशात जाण्याची शक्यता


 

  1. 'डोंबिवली फास्ट' फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक, लिव्हर सिरोसिस नावाच्या आजारामुळे हैदराबादमधील रुग्णालयात दाखल


 

  1. मुंबई लोकल आणि पॅसेंजर रल्वेसेवा सर्वसामान्यांसाठी तूर्तास बंद, तर राज्यात जिम-रेस्टॉरन्ट टप्प्याटप्प्याने सुरु होणार


 

  1. अजुनही लढाई संपली नाही, कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचा विश्वास


 

  1. कोरोना चाचणीच्या शुल्कात घट, आता 1900 रुपयांत होणार टेस्ट, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


 

  1. मराठवाड्यात कोरोना योद्ध्यांचीच उपेक्षा, 1200 हून अधिक डॉक्टरांचं वेतन थकीत; 14 ऑगस्टपासून संपाचा इशारा


 

  1. राज्य पोलिस तक्रार प्राधीकरणावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली नियुक्ती का? देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


 

  1. काही निर्बंधांसह प्रार्थनास्थळे खुली करण्याचा विचार करावा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना


 

  1. मुंबईत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, मानखुर्दमधील धक्कादायक घटना; तीन आरोपींना अटक