स्मार्ट बुलेटिन | 12 एप्रिल 2019 | शुक्रवार | एबीपी माझा
  1. सावरकरांना भित्रा म्हणणारा राहुल गांधींसारखा नालायक माणूस संसदेत पोहचता कामा नये, हातकणंगलेतील महायुतीच्या सभेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
 
  1. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात, अहमदनगरमध्ये जाहीर सभा, राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाची शक्यता
 
  1. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर, संध्याकाळी नांदेडमध्ये जाहीर सभा, पुन्हा मोदी शहांवर हल्लाबोल करण्याची शक्यता
 
  1. चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस, अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्यानं सर्वच राजकीय पक्ष चिंतेत
 
  1. पहिल्या टप्प्यासाठी देशातल्या 91 मतदारसंघात मतदान पूर्ण, उन्हाचा तडाखा आणि 4 नक्षली हल्ल्यानंतरही विदर्भात सरासरी 56 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान
  1. दोन हजार रुपये मिळाले का?...पाटण्यात गृहमंत्री राजनाथ सिंहांच्या प्रश्नाला शेतकऱ्यांचा एकसुरात नकार, शेतकऱ्यांच्या प्रतिसादानं सिंहांची कोंडी
 
  1. मुंबईतून रात्रीपासून जेट एअरवेजच्या एकही विमानांचं उड्डाण नाही, विमान उड्डाण रखडल्याने प्रवाशांचा खोळंबा, डीजीसीआयकडून विमान उड्डाणाला परवानगी नाही
 
  1. यूट्यूब व्हिडीओ पाहणे जीवावर बेतले, पहाटे व्हिडीओ पाहत असल्याच्या रागातून पत्नीची हत्या, मुंबईतल्या अंधेरीतील घटना
 
  1. मराठी मनोरंजन विश्वातील हॅपनिंग जोडपं अभिनेत्री सखी गोखले-अभिनेता सुव्रत जोशी विवाहबंधनात, मुंबईत लवकरच दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन होणार
  10.चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सवर सनसनाटी विजय, अखेरच्या चेंडूवर मिचेल सॅन्टनरचा षटकार, धोनीची 58 धावांची खेळी