- राज्यात परतीच्या पावसाचा जोर चार दिवस कायम राहण्याची शक्यता, पुणे, सांगली, कोल्हापूरला झोडपलं, मराठवाड्यात काढणीला आलेल्या पावसाचं मोठं नुकसान
- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा 'बिस्कीट'ला नकार, निवडणूक आयोगाकडे तक्रार; धनुष्यबाण चिन्हावर सत्ताधारी नितीशकुमार यांच्या जनता दल पक्षाकडून आक्षेप
- मराठा आरक्षणासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाचे रक्षण केले पाहिजे, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं माझा कट्ट्यावर मत
- राज्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; रिकव्हरी रेट 83 टक्क्यांवर
- तांत्रिक बिघाडामुळे लॉगइन न झाल्यास गुगल फॉर्मचा पर्याय, डॉ. आंबेडकर विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षा देण्यासाठी प्रत्येक सत्रात जादा वेळ मिळणार
- TRP घोटाळ्या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांच सहा जणांची चौकशी करणार; रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांचाही समावेश
7.आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत मुंबई, गुजरातमधील व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या तोतयाला अटक, खंडणीविरोधी पथकाची मोठी कारवाई
- तोट्यातील बेस्टचा तुटीचा अर्थथसंकल्प सादर, परिवहन विभागासोबतच बेस्ट उपक्रमाचा वीज विभागही तोट्यात
- विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जवर 37 धावांनी विजय; चेन्नईचा 5 वा पराभव, विराट कोहली ठरला हिरो
- महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 78 वा वाढदिवस, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव, एबीपी माझावर विशेष कार्यक्रमाची मेजवानी