देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. गर्दी वाढली तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा; अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु करण्याची केंद्राकडे मागणी


2. कोकणच्या पाहणी दौऱ्यानंतर शरद पवार आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; पॅकेजबाबत चर्चा होण्याची शक्यता, तर नुकसानग्रस्त भागात स्लॅबची पक्की घरं देण्याचा सरकारचा विचार


3. महाराष्ट्रात आतापर्यंत 44 हजार 517 रुग्ण कोरोनामुक्त, 24 तासांत 3254 कोरोना बाधितांची नोंद; तर दिवसभरात 149 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू


4. जगभरात आतापर्यंत 74 लाख 46 हजार लोक कोरोनाबाधित, तर आतापर्यंत 37 लाख कोरोनामुक्त, आतापर्यंत 4 लाख 18 हजार लोकांचा मृत्यू


5. दहावी, बारावीच्या निकालांची तारीख अद्याप जाहीर नाही, बोर्डाकडून स्पष्ट; अंतिम सत्र वगळता लॉ अभ्यासक्रमाच्या इतर वर्षांच्या परीक्षा रद्द


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 11 जून 2020 | गुरुवार | ABP Majha



6. मजुरांची अधिकृतरित्या नोंदणी करण्याचे सुप्रीम कोर्टाचे राज्यांना आदेश; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश


7. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला तर, मृत्यू दरामध्ये घट; धारावीतील डबलिंग रेट 44 दिवसांवर, मुंबईकरांना मोठा दिलासा


8. कोरोनाशी लढताना आता IAS आणि IPS अधिकारी दिसणार डॉक्टरांच्या युनिफॉर्ममध्ये; सरकारचा नवा निर्णय


9. पीएनबी बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदी, मेहुल चोक्सी प्रकरणी ईडीला मोठं यश, 1350 कोटींचे हिरे परदेशातून भारतात


10. जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु; काल जवानांकडून 5 दहशतवाद्यांचा खात्मा