1. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला आजपासून सुरुवात, विदर्भातील सात जागांसह देशभरात 91 मतदारसंघांमध्ये आज मतदान


 

  1. नागपूर आणि चंद्रपूरमध्ये दिग्गजांची लढाई, नितीन गडकरी, हंसराज अहिर, माणिकराव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, गोंदिया गडचिरोलीत चोख बंदबोस्त


 

  1. जळगावात भाजपच्या मेळाव्यात नाराजीनाट्यातून तुफान राडा, जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी. एस. पाटील भिडले, गिरीश महाजनांची दमछाक


 

  1. रायबरेलीतून सोनिया गांधी आज उमेदवारी अर्ज भरणार, तर राहुल गांधीविरोधात अमेठीतून स्मृती इराणीही शक्तिप्रदर्शन करत मैदानात


 

  1. 600 मोदी विरोधक कलाकारांविरोधात 900 मोदीसमर्थक कलाकार एकवटले, मोदी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भाजपला मतदान करण्याचं आवाहन


 

  1. गुजरातमध्ये काँग्रेसला जोरदार झटका, ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोरचा पक्षाला रामराम


 

  1. काँग्रेस म्हणजे ब्रिटिशांची औलाद तर राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसचं पिल्लू, नांदेड येथील सभेत पंकजा मुंडेंची घणाघाती टीका


 

  1. अंतराळातला कृष्णविवर पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद, शास्त्रज्ञांकडून फोटो जाहीर, पृथ्वीच्या निर्मितीचं कोडं उलगडण्यासाठी मोठी मदत


 

  1. गुगल पेवरुन दिल्ली हायकोर्टाने रिझर्व्ह बँकेला खडसावलं, विनापरवानगी भारतात गुगल पेकसं काय सुरु? हायकोर्टाचा सवाल


 

  1. कर्णधार कायरन पोलार्डच्या फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सचा पंजाबवर सनसनाटी विजय, पोलार्डची ३१ चेंडूत ८३ धावांची निर्णायक खेळी


 

व्हीडीओ :