महाराष्ट्रात विदर्भातल्या सात मतदारसंघांसह देशभरातील 91 जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासह पोलीस, प्रशासन आणि राजकीय पक्षही चांगलेच तयारीत आहेत.
जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तरीही तुम्हाला मतदान करता येणार आहे. अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.
जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल, तर कोणतं ओळखपत्र चालू शकेल?
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालक परवाना)
- पासपोर्ट (पारपत्र)
- छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक
- मनरेगा कार्यपत्रिका
- कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
- छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
- छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)
- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड
- खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्यांसाठी त्यांना दिलेलं ओळखपत्र
देशात ‘या’ सात टप्प्यांमध्ये होणार मतदान
पहिला टप्पा : 11 एप्रिल 2019 (91 मतदारसंघ) 20
राज्यं दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019 (97 मतदारसंघ ) 13 राज्यं
तिसरा टप्पा : 23 एप्रिल 2019 (115 मतदारसंघ ) 14 राज्यं
चौथा टप्पा : 29 एप्रिल 2019 (71 मतदारसंघ) 9 राज्यं
पाचवा टप्पा : 6 मे 2019 (51 मतदारसंघ) 7 राज्यं
सहावा टप्पा : 12 मे 2019 (59 मतदारसंघ) 7 राज्यं
सातवा टप्पा : 19 मे 2019 (59 मतदारसंघ ) 8 राज्यं मतमोजणी : 23 मे 2019
लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या तारखा
पहिल्या टप्प्यात (11 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 07 जागांवर मतदान
दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 10 जागांवर मतदान
तिसऱ्या टप्प्यात (23 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 14 जागांवर मतदान
चौथ्या टप्प्यात (29 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागांवर मतदान
संबंधित बातम्या
'या' कारणामुळे मतदानाची वेळ दीड तासाने वाढवली
लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी
पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावणार, विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान