1. महाराष्ट्रात कडक निर्बंधांचा नवा लॉकडाऊन लागण्याची शक्यता; कोविड टास्क फोर्ससोबत महत्त्वाची बैठक, निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, 15 दिवसांच्या लॉकडाऊनवर सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत


 



  1. लॉकडाऊनबाबत सुवर्णमध्य साधणारा निर्णय घ्या आणि 'राजकारण' न करण्याबाबत सहकाऱ्यांनाही समज द्या; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला


 



  1. महाराष्ट्र ‘व्हेंटिलेटर’वर! पुणे, नाशिक, नागपूरमध्ये एकही व्हेंटिलेटरचा बेड शिल्लक नाही, आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान; तर ऑक्सिजन संपल्याने ठाण्यातील 26 रुग्णांना इतरत्र हलवण्याची वेळ


 



  1. महाराष्ट्रासाठी येत्या तीन ते चार दिवसात 1121 व्हेंटिलेटर येणार; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती


 



  1. पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा थेट रुग्णालयांना होणार, तर नाशकात रेमडेसिवीरच्या वापरावर अन्न आणि औषध प्रशासनाची नजर; काळाबाजार रोखण्यासाठी पाऊल


 



  1. मुंबईतली मद्यविक्रीवरची बंदी उठवली, मात्र फक्त घरपोच दारु विक्रीला परवानगी; परवाना असलेल्यांनाच दारु मिळणार


 



  1. राज्यात काल दिवसभरात तब्बल 53 हजार कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले; मात्र 55 हजार 411 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद


 



  1. कोरोनाच्या संकटात भारतात लसीकरणाचा विक्रम, 85 दिवसांत 10 कोटी नागरिकांना डोस; आजपासून लस महोत्सवाला सुरुवात, मात्र महाराष्ट्र पुरेशा लसीच्या प्रतिक्षेत


 



  1. महाराष्ट्रातील काही भागांत वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; शनिवारी मुंबईसह राज्यातील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी


 



  1. औरंगाबादमध्ये नगरहून आलेल्या तरुणाच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश; फक्त 500 रुपयांसाठी केली हत्या, आरबीआय परीक्षेसाठी गावाने वर्गणी गोळा करुन दिली होती रक्कम