1. कर्नाटकानंतर गोव्यातही राजकीय भूकंपाची शक्यता, काँग्रेसचे 10 बंडखोर आमदार भाजप नेत्यांची भेट घेणार


 

  1. मुंबईत कानडी आमदारांचा हायव्होल्टेज ड्रामा सुरुच, मुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता


 

  1. गेल्या आषाढीला धमकीवजा इशारा देणारा मराठा समाज यंदा मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार, फडणवीसांना आधुनिक शाहूंची उपमा




  1. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एसईबीसी कायद्याची यंदा अंमलबजावणी नको, खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांची हायकोर्टात धाव


 

  1. मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, मुंबई-गोवा महामार्ग काहीकाळ ठप्प, वशिष्ठी नदीच्या पाणीपातळीतही वाढ


 

  1. गोरेगावमध्ये दीड वर्षांचा चिमुकला नाल्यात वाहून गेला, अग्निशामन दलाकडून शोध सुरु, उघड्या नाल्यांचा प्रश्न चव्हाट्यावर


 

  1. कणकवलीतील चिखलफेक बाळासाहेबांना आवडली असती, जामीनावर सुटल्यानतंर नितेश राणेंची प्रतिक्रिया, चंद्रकांत पाटलांविरोधात बोलणं टाळलं


 

  1. आषाढी एकादशीसाठी पंढरीत जोरदार तयारी, दर्शनासाठी 7 किमीपर्यंत रांगा, तुकोबा आणि माऊलीच्या पालखीच्या रिंगणांचा डोळे दिपवणारा सोहळा


 

  1. टीम इंडियाचं विश्वचषक विजयाचं स्वप्न अधुरं, मॅन्चेस्टरमध्ये न्यूझीलंडची टीम इंडियावर 18 धावांनी मात, जाडेजा-धोनीची झुंजार खेळी व्यर्थ


 

  1. विम्बल्डनमध्ये रॉजर फेडररचं विजयाचं शतक, ग्रॅण्ड स्लॅममध्ये ऐतिहासिक कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली