- कंटेन्मेंट झोन वगळता राज्यात अडकलेल्या लोकांना गावी परत जाण्यासाठी एसटीतर्फे मोफत बस सेवा, परिवहन मंत्रालयाकडून मजूर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
- महाराष्ट्राने कोरोना बाधित रुग्णांचा 20 हजारांचा टप्पा ओलांडला; शनिवारी दिवसभरात सर्वाधिक 48 जणांचा मृत्यू
- मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी सात आयएएस अधिकाऱ्यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती; मुंबईची सात झोनमध्ये विभागणी
- राज्यात कोरोनामुळे सात पोलिसांचा मृत्यू, आतापर्यंत 714 पोलिसांना कोरोनाची लागण
- जादा फी आकारणाऱ्या शाळांवर कारवाई करु, 'माझा'च्या बातमीनंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा, 15 जूनला शाळा सुरु करण्याचाही मानस
- नाशिक शहरात मोठी वाहतूक कोंडी, अत्यावश्यक सेवेची स्टिकर्स लावलेल्या वाहनांमधून अवैध वाहतूक, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशकडे जाणारे परप्रांतीय नागरिकांचा समावेश
- विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राजकिशोर उर्फ पापा मोदी आणि राजेश राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब; पक्षातील बड्या नेत्यांची नावे कापली
- गडचिंचले प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करा; प्रविण दरेकर यांची मागणी; पोलिसांवर कारवाई मात्र, दोषी जिल्हा प्रशासनावर कारवाई का नाही? दरेकरांचा सवाल
- पीएम केअर फंडमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा येत असल्याने ऑडिट करा; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी
- 'मी ठणठणीत, मला कुठलाही आजार झालेला नाही', प्रकृतीसंदर्भात उलट सुलट चर्चांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं ट्वीट
स्मार्ट बुलेटिन | 10 मे 2020 | रविवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 May 2020 11:33 AM (IST)
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
NEXT
PREV
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 मे 2020 | रविवार
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -