देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. कानपूरच्या चौबेपूरमध्ये पोलीस हत्याकांडाचा मुख्य आरोपी विकास दुबे ठार, अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना एन्काउंटर
2. राज्य सरकार विद्यापीठ परीक्षा न घेण्यावर ठाम, तर यूजीसीच्या गाईडलाईन्स विद्यापीठांना बंधनकारक; परीक्षांबाबतच्या संभ्रमात आणखी वाढ
3. मतोश्री 2 साठीच्या जमिनीत गैरव्यवहार झाल्याचा संजय निरूपम यांचा आरोप, निरोपम यांच्या आरोपामुळं शिवसेना काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा
4. राजगृह हल्ल्याप्रकरणी एकाला अटक, तोडफोड करणारा व्यक्ती मजूर असल्याची माहिती; तर दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरु
5. आजपासून 3 दिवस राज्यातील कृषीसेवा केंद्र बंद राहणार, बोगस बियाणांप्रकरणी दुकानदारांवर सुरु असलेल्या कारवाईचा निषेध
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 जुलै 2020 | शुक्रवार | ABP Majha
6. राज्यात काल दिवसभरात 6 हजार 875 कोरोनाग्रस्त, तर 219 रुग्णांचा मृत्यू; दिवसभरात 4 हजार 67 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात
7. जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, गेल्या 24 तासांत सर्वाधिक 2.22 लाख कोरोना बाधितांची नोंद, जगभरात आतापर्यंत एक कोटी 23 लाख 78 हजार रुग्ण
8. भारत-चीन सीनेवरील शांततेसाठी आज दोन्ही देशांमध्ये बैठक, सैन्य माघारी जात असताना सीमावादावर पुन्हा चर्चा
9. मृतदेह अदला-बदली प्रकरणी ठाणे पालिकेची कारवाई, कोविड रुग्णालयातील डॉक्टर योगेश शर्मा यांची बदली, तर चार परिचारीका निलंबित
10. मुंबई पालिकेकडून मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरु, विनामास्क फिरणाऱ्यांना एक हजारांचा दंड, कुर्ला रेल्वे स्थानकावाहेर कारवाई