देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. सीबीआयचा ससेमिरा चुकवण्यासाठी वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला, सूत्रांची माहिती; देश लॉकडाऊन असताना वाधवान यांना प्रवासासाठी पत्र देणारे विशेष गृह सचिव अमिताभ गुप्त सक्तीच्या रजेवर


2. काल दिवसभरात राज्यात कोरोनाचे 229 नवे रूग्ण, तर 25 रूग्णांचा मृत्यू; राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 1364वर


3. कोरोनाच्या जगावरील संकटाला शंभर दिवस पूर्ण, जगभरात 55 हजारांहून अधिक बळी; काल एकट्या न्यूयॉर्क शहरात 800 जणांचा जीव गेला


4. निजामुद्दीन मरकजहून परतलेले 58 तब्लिगी अद्याप लपून, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती; मरकजमुळेच कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा गंभीर आरोप


5. एप्रिल 2021 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व आमदारांची 30 टक्के वेतन कपात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय; महाराष्ट्र दिनी होणारा समारंभही रद्द


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 एप्रिल 2020 | शुक्रवार | ABP Majha



6. भिवंडीतील प्लास्टिक कारखान्याला भीषण आग, लॉकडाऊनमुळे गोदाम बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी नाही, प्लास्टिकसह दोन गोदामं जळून खाक


7. जेलमध्ये असलेल्या कैद्यांनी सध्या जेलमध्येचं राहिलेलं बरं, बाहेर परिस्थिती जास्त भयानक; जामीनासाठी याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टाचा मोलाचा सल्ला


8. मुंबईत सक्तीचं लॉकडाऊन राबवणार, कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारचं पाऊल; तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रॅपिड टेस्टची महापालिकेची मागणी


9. 'मला कोरोना झालाय', मनोरुग्णाचा पोलीस चौकीत घुसून धुडगूस, अचानक घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांमध्ये भीतीचं वातावरण, लातूर शहरातील घटना


10. मांजर पाळताय, खबरदारी घ्या ! मांजरामुळे होऊ शकतो 'कोरोना', जर्नल सायन्सच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यास लेखात माहिती