स्मार्ट बुलेटिन | 10 ऑगस्ट 2020 | गुरुवार | एबीपी माझा
खारच्या फ्लॅटवरुन कंगनाचं शरद पवारांकडे बोट, जितेंद्र आव्हाडांचं कंगनाला उत्तर
मालक उपस्थित नसताना आत घुसखोरी करत कारवाईचं कारण काय? हायकोर्टाकडून BMC ला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
ड्रग्सचे आरोप असणाऱ्या व्यक्तीला वाय प्लस सेक्युरिटी पुरवणं कितपत योग्य, चौकशीची मागणी करत प्रताप सरनाईकांचं गृहमंत्र्यांना पत्र
रियाच्या जामिनासाठीच्या याचिकेवर आज सुनावणी, मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
मराठा आरक्षणासंदर्भात सरकार गंभीर नाही; फडणवीसांची टीका, तर अंतरिम आदेश धक्कादायक, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
उर्वरित आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणार, महसूल मंत्र्यांची माहिती
नागपुरात कोरोना रुग्णांची वाढ चिंताजनक, दिवसागणिक दोन हजार रुग्ण!
भारतीय वायुसेनेत आज राफेलची एन्ट्री होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांसह फ्रांसच्या संरक्षण मंत्र्यांची उपस्थिती
अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये जगातील 54 टक्के कोरोना रुग्ण, तीन देशांमध्ये 44 टक्के मृत्यू