देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. राज्यात 1089 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 19 हजार 063, तर मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या घरात


2. जगभरात कोरोनाचे 40 लाखांपेक्षा जास्त रुग्ण, बळींची संख्या पावणे तीन लाख, रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौदाव्या स्थानावर


3. सांगलीत अडकलेल्या 480 कामगारांना घेऊन एसटीच्या 16 बस रात्री उशिरा तामिळनाडूला रवाना, वैद्यकीय तपासणी आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन


4. औरंगाबादच्या रेल्वे अपघाताच्या घटनेने व्यथित झालो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दु:ख्य व्यक्त, मजुरांनी संयम राखण्याचंही आवाहन


5. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची उचलबांगडी; इक्बाल चहल नवे आयुक्त, कोरोना रुग्णांची वाढ रोखण्यास असमर्थ ठरल्याच्या कारणामुळे बदली झाल्याची चर्चा


6. लॉकडाऊनचे नियम मोडून मुंबईत पार्टी; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वांद्रे जिमखाना अध्यक्षासह 15 सभासदांवर गुन्हा दाखल


7. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्याच्या कुंटुबातील एकाला नोकरी देण्याची बेस्ट प्रशासनाची घोषणा, तृतीय किंवा चतुर्थ श्रेणीत शिक्षणानुसार पद देणार


8. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या उरलेल्या पेपरची तारीख जाहीर, 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान उर्वरित विषयांची परीक्षा होणार


9. निर्णयाचा अजिबात धक्का बसला नाही, भाजपच्या त्या चारही उमेदवारांना आशीर्वाद, भाजपने विधानपरिषद निवडणुकीत डावलल्यानंतर पंकजा मुंडे यांचं ट्वीट


10. नवी मुंबई एपीएमसी भाजी मार्केट 11 ते 17 मे या कालावधीत बंद, कोरोनाचा कम्युनिटी संसर्ग टाळण्यासाठी माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीनंतर निर्णय