1. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक, काल 12,822 रुग्णांची नोंद, कोरोनाबाधित रुग्णांचा पाच लाखांचा टप्पा पार

Continues below advertisement

2. अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल,श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं उपचारासाठी रुग्णालयात, कोरोनाची रॅपिड टेस्ट निगेटीव्ह

3. कोझिकोड विमान अपघातात महाराष्ट्राचे सुपूत्र वैमानिक दीपक साठेंचा मृत्यू, दीपक यांच्या प्रसंगावधानामुळे 170 जणांचे जीव वाचले, विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

Continues below advertisement

4. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची गरज नाही, गृहमंत्री अनिल देशमुखांचा दावा, दिशा सॅलियनचा अखेरचा व्हिडिओही व्हायरल

5. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसे गाड्या सोडणार, तर गावी जाणाऱ्या नागरिकांना ई-पाससाठी 'गणेशोत्सवा'चा पर्याय उपलब्ध

6. उल्हासनगरमध्ये खाद्यपदार्थांच्या दुकानात सिलेंडरचा भीषण स्फोट, पाच जण जखमी, सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

7. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कराल तर याद राखा कर्नाटकात येवून मस्ती जिरवू, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कर्नाटक सरकारला इशारा

8.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचं उद्घाटन, 'गंदगी मुक्त भारत' मोहिमेची सुरुवात

9. चंद्रपूर वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्त आंदोलक सलग चौथ्या दिवशी 460 फूट उंच चिमणीवर

10.दिशा सुशांतची मॅनेजर नव्हतीच; मुंबई पोलिसांकडून स्पष्ट.. दोघांमधील व्हॉट्सअॅप चॅटवरील एक्स्क्लुझिव्ह संभाषण एबीपी माझाच्या हाती