देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. राज्यात काल दिवसभरात 1 हजार 216 नवे कोरोनाग्रस्त, 24 तासांत 43 रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 18 हजारांच्याजवळ

2. अमरिकेत सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू, आतापर्यंत अमेरिकेत 77 हजार बळी, जगभरातील मृतांची संख्या अडिच लाख पार

3. दुबईहून 182 भारतीय कोची विमानतळावर दाखल, तर मालदीवमध्ये अडकलेले 750 भारतीय कामगार जलाश्म युद्धनौकेतून भारताच्या दिशेने रवाना

4. इतक्यात कोरोनावर मात शक्य नाही, तर जून-जुलैमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर, दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचं भाकित

5. विद्यापीठ परीक्षांबाबत आज दुपारपर्यंत निर्णय अपेक्षित, मंत्री उदय सामंत यांची माहिती, तर जेईई अॅडव्हान्स परीक्षा 23 ऑगस्ट रोजी

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 08 मे 2020 | शुक्रवार | ABP Majha



6. पालघर हत्याकांड प्रकरणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह सक्तीच्या रजेवर, गृहमंत्री अनिल देशमुख यांची कारवाई

7. परप्रांतिय गावी गेल्यानं भूमिपुत्रांना न्याय देण्याची संधी, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांचा सल्ला, मास्क न घालताच मंत्रालयात हजेरी

8. मालगाडीच्या धडकेत 14 मजुरांचा मृत्यू, तर दोन जण जखमी, जालना-औरंगाबाद मार्गावर करमाडजवळ दुर्दैवी घटना, भुसावळला पायी चालत जाताना अपघात

9. पंढरपुरात कोरोना संकटातही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधींची उलाढाल, 800 कोटींची द्राक्षे विकली, कासेगावातील द्राक्ष बागांचा माल देशातील अनेक बाजारपेठांत दाखल

10. टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची 18 वर्षांच्या मराठमोळ्या तरुणाच्या फार्मसीमध्ये गुंतवणूक, 'जनरिक आधार'मध्ये टाटा यांची 50 टक्क्यांची भागीदारी