- केरळच्या कोझीकोडमध्ये एअर इंडियाचं एक विमान कोसळलं, दुर्घटनेत विमानाच्या पायलटसह 19 जणांचा मृत्यू झाला, तर 170 प्रवाशी बचावले
- रिया चक्रवर्तीची ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा ठपका; सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीची आज चौकशी
- सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात 21 ऑगस्टला सुनावणी, सर्वोच्च न्यायालयात 18 ऑगस्टला सुनावणी होणार असल्यानं हायकोर्टाचा निर्णय
- पंचगंगेची पाणीपातळी आणखी एक इंचाने कमी, राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा बंद; कोल्हापूरकरांना दिलासा
- फक्त 225 रुपयांत कोरोनाची लस मिळणार, सीरम इन्स्टिट्यूटची माहिती; जगभरातील गरीब देशांनाही लस पुरवण्याचा मानस
- खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
- कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कोकणात मागेल त्या गावी एसटी, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा उपक्रम!
- बोगस सोयाबीनप्रकरणी राज्य सरकार 'ॲक्शन मोड'वर, अकोल्यात 'महाबीज'सह पाच कंपन्यांवर खटले
- एक सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याबाबत केंद्राचा विचार सुरु, अनलॉक 4 च्या गाईडलाईन्समध्ये शाळांबाबतही नियमावली देण्याची शक्यता
- 2021 चा टी-20 विश्वचषक भारतात, आयसीसीच्या बैठकीत निर्णय; 2022 च्या टी-20 विश्वचषकाचं यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे, तर महिला विश्वचषक 2022 पर्यंत रद्द