1. लसीकरणावरुन केंद्र आणि राज्य सरकारमधलं राजकारण शिगेला, महाराष्ट्रामुळं कोरोना विरोधी लढ्याला फटका, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा घणाघात
2. महाराष्ट्रात तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती, रुग्ण आणि लोकसंख्येच्या तुलनेत गुजरातला लसीचा जास्त पुरवठा होत असल्याची आकडेवारी
3. सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्बमध्ये अनिल परब, अनिल देशमुख आणि अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख, काही नेत्यांची सीबीआय चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती, तर अनिल परब यांनी आरोप फेटाळले
4. गृहमंत्रीपद गमवावं लागलेल्या अनिल देशमुखांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, परमबीर सिंह लेटर बॉम्ब प्रकरणी सीबीआय चौकशीच्या आदेशाला आव्हान
5. महाराष्ट्रात काल दिवसभरात जवळपास 60 हजार नव्या रुग्णांची नोंद, नवी मुंबईतल्या काही शाळांमध्ये कोविड रुग्णालय सुरु करणार, केडीएमसीसमोरही खाटा वाढवण्याचं आव्हान
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 8 एप्रिल 2021 | गुरुवार | ABP Majha
6. शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन नव्हे तर ऑनलाईनच होणार, बदल्यासंदर्भातलं नव धोरण जाहीर
7. मुंबई गिरणी कामगार संघर्ष समितीचे झुंजार नेते दत्ता इस्वलकरांचं निधन, वयाच्या 72व्या वर्षी जे. जे. रुग्णालयात अखेरचा श्वास
8. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून फेब्रुवारी महिन्यातील गाड्यांची नोंद गायब; एटीएसच्या तपासातून माहिती समोर
9. ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन अयोग लागू, महासभेत प्रस्ताव सुचनेसह मंजूर
10. जम्मू-काश्मीरमधून लष्कर, पोलिसांच्या कोणत्याही कारवाईचं थेट प्रक्षेपण करण्यास माध्यमांना बंदी