स्मार्ट बुलेटिन | स्मार्ट बुलेटिन | 08 एप्रिल 2020 | बुधवार

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

Continues below advertisement
  1. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1018 वर पोहोचली, काल दिवसभरात 150 नवीन रुग्णांची नोंद; तर गेल्या 24 तासांत 12 जणांचा मृत्यू
  2. कोरोना वाढता प्रसार पाहता 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम राहण्याची शक्यता, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार; एएनआयचं वृत्त
  3. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित, 26 एप्रिलला होणारी एमपीएससी परीक्षा तात्पुरती स्थगित
  4. कॅडिला हेल्थकेअर कंपनी कोरोना विषाणूवर लस बनवल्याचा दावा, प्राण्यांवर चाचणी सुरु; सकारात्मक रिझल्ट आल्यास माणसांवर उपचाराकरिता उपलब्ध होणार
  5. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात मध्यवर्ती पुण्यातील खडक, फरासखाना, स्वारगेट, कोंढवा या पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्रीपासून कर्फ्यू लागू; पोलीस आणि प्रशासनाच्या बैठकीनंतर निर्णय
  6. मरकजवरून मुंबईत आलेल्या 150 तब्लिगींवर गुन्हा दाखल, महापालिकेच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांकडून कारवाई
  7. मुंबईचा धोका टाळण्यासाठी धारावी लॉकडाऊन करा, शिवसेना खासदार राहुल शेवाळेंची मागणी  तर सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्यास मुंबईतील भाजीमंडई बंद करणार; महापौर किशोरी पेडणेकर यांचा इशारा
  8. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर मारहाण झाल्याची तरुणाची पोलिसांत तक्रार, आव्हाडांनी आरोप फेटाळले; तर जितेंद्र आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, देवेंद्र फडणवीसांची मागणी
  9. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींच्या पंतप्रधानांना सूचना; मीडियाच्या जाहिराती बंद करण्याचा सल्ला, एनबीएची नाराजी
  10. कोरोनाचं जगातील संकट पाहता भारताचा मदतीचा हात; अमेरिकेसह शेजारील देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध देणार, पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांची माहिती
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola