देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...



    1. मुंबई, ठाण्याला पावसाने झोडपलं, सखल भागात अर्धा ते एक फूट पाणी साचलं; पुढचे काही तास मुसळधार पावसाचे, हवामान खात्याचा इशारा

    2. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दोन लाखांच्या पार, काल दिवसभरात सर्वाधिक 7074 नवे रुग्ण तर मुंबईत 1163 कोरोना बाधित

    3. कल्याण डोंबिवलीत कोरोना विळखा, सलग तिसऱ्या दिवशी 550 कोरोना बाधितांची नोंद तर ठाण्यात 408, नवी मुंबईमध्ये 257 कोरोनाबाधित

    4. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ 'कोरोना' पॉझिटिव्ह;  काल उपमुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थिती

    5. टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं नाही तर कोरोनाचं संक्रमण वाढेल; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

    6. कोणताही आजार नसताना कोरोनामुळे 43 टक्के रुग्णांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य खात्याची आकडेवारी; तर दगावणाऱ्यांमध्ये तीनपैकी एक रुग्ण 45 ते 59 वयोगटातला

    7. मुंबईत कोरोनासोबतच पावसाळ्यातील आजारांचंही संकट! साचलेल्या पाण्यातून लेप्टोचा संसर्ग होण्याची भीती

    8. मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या सूचनांचा विचार करावा, महाविकास आघाडीतील बैठकांवरुन देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा

    9. पारनेर तालुक्यात शिवसेनेला धक्का! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

    10. आयकर भरण्यासाठी आता 30 नोव्हेंबर पर्यंतची मुदतवाढ, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना मोठा दिलासा