देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतमोजणीला सुरुवात, 24 कोटी अमेरिकन मतदार नवा अध्यक्ष निवडणार, ट्रम्प-बायडेन यांच्यात कांटे की टक्कर!


 

  1. कांजूरमार्गची जागा राज्य सरकारचीच, केंद्र सरकारच्या दाव्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं ट्वीट


 

  1. अल्प बुद्धी, बहु गर्वी! कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन अमृता फडणवीस यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल


 

  1. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर लाखो फेक अकाऊंट्स बनवून राज्य सरकार, मुंबई पोलिसांची बदनामी; चौकशीतून माहिती उघड


 

  1. ठाकरे पितापुत्रांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या समित ठक्करला 6 दिवसांची पोलीस कोठडी


 

  1. राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती


 

  1. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक, वजन करण्यासाठी वाहनांच्या 3 किमीपर्यंत रांगा; सोयाबीनला 4 हजारपर्यंतचा भाव


 

  1. नदी पुनरुज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी जिल्ह्याची निवड; अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल


 

  1. कंगना रनौत विरोधात गीतकार जावेद अख्तर यांच्याकडून मानहानीचा दावा दाखल, राष्ट्रीय वाहिन्यांवरुन बदनामी केल्याचा आरोप


 

  1. हैदराबादची मुंबई इंडियन्सवर 10 विकेट्सने मात, हैदराबादची प्ले ऑफमध्ये धडक; डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहाची अभेद्य सलामी