देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. कंटेन्मेंट क्षेत्र वगळता रेड झोनमध्ये दुकानं सुरु, दारू विक्रीही होणार राज्य सरकारचा मोठा निर्णय, सलूनसह मॉल्स, हॉटेल्स मात्र बंद राहणार

2. काल दिवसभरात राज्यात 678 नवे रुग्ण, तर 27 जणांचा मृत्यू, आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 13 हजारांवर

3. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 40 हजार पार, तर आतापर्यंत 10 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त, मृतांचा आकडा 1300 वर

4. परराज्यातील घरी परतणाऱ्या मजूर, कामगारांकडून रेल्वेने तिकीट आकारू नये; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विनंती

5. दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची प्रवासाची व्यवस्था करा, सत्यजीत तांबे यांची अरविंद केजरीवाल यांच्याकडे मागणी

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 04 मे 2020 | सोमवार | ABP Majha



6. धारावीत कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढ, प्रतिधारावी असलेल्या दहिसरच्या गणपत पाटील नगर झोपडपट्टीत मात्र कोरोनाचे केवळ दोन रुग्ण

7. वांद्र्यातील भाभा रूग्णालयाबाहेर परप्रांतिय मजुरांची गर्दी, वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी झुंबड, सोलापुरात मात्र सोशल डिस्टन्सिंगचं पालन

8. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या योद्ध्यांचा सैनदलाकडून सन्मान, वायूदलाच्या लढाऊ विमानांतून पुष्पवृष्टी, नागपूर आणि औरंगाबादमध्येही मानवंदना

9. आयएफएससीच्या मुद्यावरून शरद पवारांचं केंद्राला पत्र, मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप, निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी

10. विधानपरिषदेसाठी इच्छुक असल्याचं एकनाथ खडसे यांचं वक्यव्य, पक्षश्रेष्टींकडे इच्छा व्यक्त केल्याची माहिती, 21 मे रोजी विधानपरिषदेची निवड