- 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अजहरचा खात्मा झाल्याची चर्चा, 26 फेब्रुवारीपासून कुणालाही भेटला नसल्याचीही माहिती, मात्र पाकिस्तानकडून दुजोरा नाही
- एअर स्ट्राईकचा पुरावा मागणाऱ्यांकडून सैन्याचं मानसिक खच्चीकरण, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, राहुल गांधींच्या अमेठीत सुरु होणार अत्याधुनिक रायफल्सची निर्मिती
- अहमनगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडेच, अजित पवारांच्या स्पष्टोक्तीमुळे आघाडीत पुन्हा तिढा, सुजय भाजपच्या वाटेवर असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांचे संकेत
- भाजपच्या बाईक रॅली अभियानात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची घोडेस्वारी, जालन्यातील मंठा परिसरात घोड्यावरुन फेरफटका
- धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे सवलती देण्याला आदिवासी संघटनांचा विरोध, निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा, निवडणुकीत लोकप्रतिनिधींवर बहिष्कार घालण्याची भूमिका
- 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देऊन फटाके फोडणाऱ्या दोघांना नागरिकांनी बांधून बेदम चोपलं, बेळगावच्या कामत गल्लीतील प्रकार
- मुंबईतील दुसऱ्या टप्प्यातल्या मोनोरेलला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील, तर परळ टर्मिनसही रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार
- आर्थिक तोट्यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळाचं नवं पाऊल, राज्यातील लालपरीमध्ये डिझेलऐवजी एलएनजीचा वापरण्याचा निर्णय, वर्षाला एक हजार कोटींचा खर्च वाचणार
- आगामी विश्वचषकात भारताला पाकिस्तानसोबत खेळावंच लागेल, पाकिस्तान संघाला बाहेरचा रस्ता दाखवण्याची बीबीसीआयची मागणी आयसीसीने फेटाळली
- महाशिवरात्रीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम, मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरात शिवलिंगावर दुग्धाभिषेक, तर अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा महासागर
स्मार्ट बुलेटिन