1. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार, सायन, हिंदमाता भागात पाणी साचलं, ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही संततधारा सुरुच, मध्य रेल्वे उशिराने

    2. दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचं आज विसर्जन, मुंबईतल्या समुद्रात दुपारी भरतीच्या लाटा उसळणार, कृत्रिम तलाव वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन

    3. भाजपच्या वाटेवर असलेल्या उदयनराजेंची मनधरणी करण्यात अमोल कोल्हे अपयशी, मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, बैठकीनंतर कोल्हेंचे सूचक उद्गार

    4. गणेश विसर्जनापूर्वीच युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची चिन्ह, सेनेशी चर्चा करण्याची जबाबदारी मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांच्या खांद्यावर

    5. शिखर बँक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम, अजित पवारांसह 50 बड्या नेत्यांच्या अडचणीत वाढ






  1. प्रेमप्रकरणातून परळीत युवकाची हत्या, पाच रुपयाच्या ब्लेडने दोन अल्पवयीन मुलांकडून कृत्य

  2. पुढच्या वर्षीही वर्षा बंगल्यावरच बाप्पांचं स्वागत करु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

  3. अमेरिका बनावटीची 8 अपाचे एएच-64 लढाऊ हेलिकॉप्टर वायुसेनेच्या ताफ्यात दाखल, पठाणकोटमध्ये आज लोकार्पण कार्यक्रम

  4. युद्धाची भाषा करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नरमले, पाककडून पहिल्यांदा अण्वस्राचा वापर होणार नसल्याचं विधान

  5. टीम इंडियानं जमैका कसोटीत विंडीजचा 257 धावांनी उडवला धुव्वा, भारताचं मालिकेत 2-0 असं निर्भेळ यश