1. पाकिस्तानी सैन्याकडून विंग कमांडर अभिनंदन यांचा मानसिक छळ, व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठीसुद्धा दबाव टाकल्याची सुत्रांची माहिती

  2. दहशतवाद्यांशी लढण्यास पाकिस्तान सक्षम नसल्यास, त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही दहशतवाद नष्ट करु, गृहमंत्री राजनाथ सिंहांचं पाकिस्तानला आवाहन

  3. गेल्या काही दिवसांत देशाला राफेलची कमतरता जाणवली, राफेलवरुन राजकारण न करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

  4. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी एनडीएच्या प्रचाराला आजपासून बिहारमधून सुरुवात, 9 वर्षांनंतर पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार एकाच व्यासपीठावर दिसणार

  5. सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ग्रामविकास खात्यात 13 हजार 514 जागांसाठी लवकरच मेगाभरती, महिला व बालविकास मंत्रीपंकजा मुंडेंची घोषणा

  6. नाणार प्रकल्प रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, अधिग्रहीत जमिनी परत करणार, नाणारवासियांकडून जल्लोष

  7. एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळेपर्यंत धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू, सरकारचा महत्त्वाचा निर्णय, निवडणुकांच्या तोंडावर हालचालींना वेग

  8. राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयांच्या कामकाजावर अंकुश ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी लोकपालची नियुक्ती करणार, शिक्षणमंत्री विनोद तावडेंची माहिती

  9. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर राज्याची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकिलाची नियुक्ती, सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्णय

  10. दोन वर्षांपासून रखडलेला मोनोरेलचा 12 किलोमीटरचा दुसरा टप्पा आजपासून सुरु, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण