देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा अडीच हजार पार, 53 जणाचां मृत्यू, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त, तर जगभरात 9 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण


2. 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करुन दिवे, मेणबत्ती टॉर्च लावा, कोरोनाच्या संकटावर पंतप्रधान मोदींचा नवा उपक्रम


3. मुंबईतील वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा पहिला बळी, कोळी समाजाचे नेते मोरेश्वर कोळी यांचा मृत्यू, पत्नी आणि मुलगाही कस्तुरबा रुग्णालयात दाखल


4. पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा, शहरातील 14 पैकी 11 रुग्ण आधीच कोरोनामुक्त


5. तीन महिन्यांचा पगार थकल्याने ठाण्यातील औषध फवारणी कर्मचाऱ्यांचा ठिय्या, समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच कर्मचाऱ्यांचा आरोप, आंदोलनामुळे रोगप्रतिबंधक फवारणीवर प्रश्न उपस्थित


6. पुण्यात लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना लुटणाऱ्या पाच विक्रेत्यांवर गुन्हा दाखल, तीन किराणा दुकानदार, एक मेडिकल, एक गॅस एजन्सीचा समावेश, गुन्हे शाखेची कारवाई


7. बीड शहरात चारशे दुचाकी पोलिसांकडून जप्त, जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली लॉकडाऊनचे नियम मोडत शहरात फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई


8. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ऐतिहासिक अमृतांजन पूल पाडणार, लॉकडाऊनमुळे वाहनांची संख्या घटल्याने पूल हटवण्याचा मुहूर्त ठरला, 4 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान पूल जमीनदोस्त होणार


9. पंढरपुरात तरुण उद्योजक अभिजीत पाटील यांचा आदर्श उपक्रम, आपत्कालीन यंत्रणेला नाश्ता आणि दोन वेळचे मोफत जेवण, 30 हजार लोकांच्या जेवणाची तयारी


10. लॉकडाऊनमुळे एका लग्नाच्या तीन तारखा; तिसऱ्यावेळी नववधू थेट दुचाकी चालवत नवरदेवाच्या दारात, यवतमाळमध्ये वधूच्या आई-वडिलांच्या अनुपस्थितीत लग्न संपन्न