1. पाकिस्तानचं शेपूट वाकडंच, पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात दोन चिमुरड्यांसह एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू, वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन
 
  1. पाकिस्तानच्या फाईटर प्लेनला जमिनीवर आणणारा भारताचा वाघ मायदेशी, देशभर दिवाळीसाखरी आतषबाजी, दिल्लीत आज मेडीकल तपासणी
  2. मायदेशी पाय ठेवल्याचा आनंद शब्दात न सांगण्यासारखा, परतल्यानंतर अभिनंदन यांची पहिली प्रतिक्रिया, तर सोशल मीडियातून स्वागताचा पाऊस
  3. बालाकोटमध्ये किती दहशतवादी मारले, आकड्याचा पुरावा द्या, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं केंद्र सरकारला आवाहन
  4. सर्वांसाठी महाआघाडी खुली, वांद्रेतल्या सभेत मनसेला आघाडीत घेण्याबाबत राहुल गांधींचे संकेत
  5. दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून महाराष्ट्राला 4,714 कोटींची मदत, राज्य सरकारला लवकरच निधी मिळणार
  6. सांगलीत दहावीची परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीला भीषण अपघात, चालक ठार, 6 विद्यार्थ्यांसह नऊ जण जखमी
  7. बेकायदा होर्डिंग प्रकरणी शिवसेना, काँग्रेस आणि बसपाला हायकोर्टाची नोटीस, शहरं विद्रुप करणाऱ्या राजकीय पक्षांचा समाचार घेतला
  8. फरार घोषित केल्याला आव्हान देण्याऐवजी मल्ल्या भारतात परत का येत नाही?, मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
  9. भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात आज एकदिवसीय मालिकेतला पहिला मुकाबला, टी-20 पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज
VIDEO | स्मार्ट बुलेटिन | 2 मार्च 2019 | शनिवार | एबीपी माझा