देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी दुपारी तीन वाजता महत्त्वाची बैठक, अटीशर्तींसह चर्चा शेतकऱ्यांची मागणी केंद्र सरकारकडून मान्य


2. योगी आदित्यनाथ मुंबईत येऊन सिनेकलाकार आणि दिग्दर्शकांना भेटणार, बॉलिवूड उत्तर प्रदेशला हलवण्यासंदर्भात चर्चा होणार, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष


3. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात, पदवीधरच्या तीन तर शिक्षक मतदारसंघाच्या दोन जागांसाठी निवडणूक


4. हैदराबाद महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान, एमआयए, टीआरएस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर, चार डिसेंबरला निकाल


5. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते, नारायण राणेंचा दावा, तर दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस, जयंत पाटलांचं उत्तर


6. राज्यात 12 विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल, तर मराठवाड्यातून मुंबईला येणाऱ्यांसाठी देवगिरी आणि राज्यराणी एक्स्प्रेस आजपासून सुरु


7. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या, हल्लेखोरांकडून धारदार शस्त्राने वार, खुनाचं कारण अस्पष्ट


8. शिर्डीच्या साई मंदिरात भारतीय पेहरावात येण्याचं भक्तांना आवाहन, भाविक तोकडे कपडे घालून येत असल्याची तक्रार, मंदिर परिसरात आवाहनाचे फलक


9. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरला दुखापत, भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे आणि ट्वेण्टी-20 मालिकेला मुकणार, वॉर्नरऐवजी डार्सी शॉर्टचा संघात समावेश


10. अभिनेता रोनित रॉयच्या मुलाने ऑनलाईन पीएस 4 गेम मागवला, घरी आला रिकामा बॉक्स, रोनित रॉय यांच्या नाराजीनंतर अॅमेझॉनकडून दिलगिरी व्यक्त