एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन | 23 मार्च 2020 | सोमवार 

  1. मुंबई लोकलसह देशभरातील प्रवासी रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत बंद, मेट्रो, मोनोची सेवाही रद्द, फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बससेवा उपलब्ध असणार, शहरांपासून खेड्यापाड्यात धावणारी एसटीही थांबणार


 

  1. कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांची घोषणा, नागरी भागात जमावबंदीचे आदेश, फक्त जीवनावश्यक वस्तूच मिळणार, मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरात जमावबंदी लागू


 

  1. महाराष्ट्रात अकरा नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 75वर, तर देशातल्या रुग्णांचा आकडा 396 पार, मुंबई, पाटणा आणि सूरतमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू


 

  1. मुंबई आणि ठाण्यात वृत्तपत्र विक्रेते व्यवसाय बंद ठेवणार, आता दारोदारी वृत्तपत्र येणार नाहीत, 31 मार्चपर्यंत वृत्तपत्र न विकण्याचा पवित्रा


 

  1. नोटांची छपाई आणि पासपोर्टलाही कोरोनाचा फटका, 31 मार्चपर्यंत नाशिकची करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस बंद


Smart Bulletin | कोरोनामुळे जगभरात 14हजारांपेक्षा अधिक मृत्यू, इटलीत मृतांची संख्या साडेपाच हजार



  1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षार्थींची मागणी मान्य, पाच एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता 26 एप्रिलला होणार


 

  1. कोरोनामुळे जगभरात 14 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू, इटलीत मृतांची संख्या साडेपाच हजार, तर अमेरिकेत 24 तासात 100 जणं दगावली


 

  1. मुंबईतील नागपाड्यात सीएए आणि एनआरसीविरोधात सुरू असलेलं आंदोलन तब्बल 55 दिवसांनी स्थगित, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महिलांचा निर्णय, सोशल मीडियावर आंदोलन सुरूच राहणार


 

  1. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, हल्यात 17 जवान शहीद तर 14 जवान जखमी, नक्षली आणि जवानांमध्ये तब्बल तीन तास चकमक


 

  1. कोरोनामुळे वीज ग्राहकांना आता सरासरी बिल मिळणार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा बिल छपाई न करण्याचा निर्णय