1. मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय, मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावासाची शक्यता, मराठवाड्यातही जोरदार हजेरी
2. दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणारे ठाण्यातील मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, निर्बंध असतानाही मनसे,भाजप दहीहंडी साजरी करण्यावर ठाम,
3. ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंवर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला, हल्लेखोर ताब्यात, हल्ल्याच्या निषेधार्थ आज अधिकाऱ्यांचं आंदोलन
4. परिवहन मंत्री अनिल परब ईडी चौकशीसाठी हजर राहणार की नाही याकडे लक्ष, तर शिवसेना खासदार भावना गवळीच्या संस्थाही ईडीच्या रडारवर
5. भाजपने जुलमी सत्र सुरु केलंय, पाच संस्थांवरील ईडीच्या छापेमारीनंतर खासदार भावना गवळी यांचा भाजपवर हल्लाबोल
6. 5 सप्टेंबरपर्यंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करा, आरोग्य विभागाचे आदेश
7. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून मुंबई महापालिकेने अॅक्शन प्लान तयार, नियमांच्या कडक अंमलबजावणीचे आयुक्तांचे निर्देश
8. औरंगाबादेत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या; 1-2 रुपये भाव मिळाल्याने निराश होऊन उचललं टोकाचं पाऊल
9. ॲमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष अमित अग्रवाल अडचणीत, घेतलेल्या वस्तूची पावती न दिल्यानं उल्हासनगर दंडाधिकारी कोर्टाकडनं समन्स जारी
10. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकपटू सुमित अंतिलची विश्वविक्रमासह सुवर्ण पदकाला गवसणी