स्मार्ट बुलेटिन | 31 ऑक्टोबर 2021 | रविवार | एबीपी माझा


महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1.  उद्यापासून पाच महत्त्वाच्या बदलांची अंमलबजावणी, बँकेत पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क आकारणार, हेल्मेट, सीटबेल्टशिवाय वाहनं चालवणं महागात पडणार


1 नोव्हेंबर म्हणजे उद्यापासून बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क द्यावं लागणार आहे. बँक ऑफ बडोदानं यांची सुरवात केली आहे. देशभरातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार आहे.  उद्यापासून रेल्वेचं नवं वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. 13 हजार प्रवासी गाड्या आणि 7 हजार मालगाड्यांच्या वेळेत हे बदल होणार आहेत. गॅस सिलेंडरच्या बुकींगसाठी आता ओटीपी द्यावा लागणार आहे. उद्यापासूनच हा नवा बदल लागू होणार आहे. त्यामुळे यापुढे ओटीपी दिल्यानंतरच ग्राहकाला गॅस सिलेंडर मिळणार आहे. उद्यापासून काही आयफोन आणि अॅन्ड्रॉईड फोन्समध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. Ice Cream Sandwich व्हर्जन आणि iOS 9 हे ऑपरेटींग सिस्टम असलेल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. 


2. पुण्यातील बालेवाडीमध्ये निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती, अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु


3. नवा फोटो ट्विट करत नवाब मलिकांकडून पुन्हा एकदा वानखेडे पिता-पुत्रावर निशाणा, फोटोतील व्यक्तीसोबतचे संबंध जाहीर करण्याचं आव्हान


4. विदर्भातील उद्योगांना पुन्हा एकदा ऐन दिवाळीत ब्रेक लागण्याची शक्यता, सर्व कोळसा वीजनिर्मितीसाठी वळवल्यानं उद्योगांपुढे संकट


5. आंतरराष्ट्रीय मोठ्या कंपन्यांच्या नफ्यावर आकारणार 15 टक्के कर.. रोममध्ये झालेल्या G-20 परिषदेत महत्त्वपूर्ण करार


6 . 22 वर्षांनंतर पोप फ्रान्सिस येणार भारत दौऱ्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं आश्वासन


7.  सातारा शहरातील खळबळजनक घटना, दिवाळीसाठी लायटिंग करताना शॉक लागून कुटुंबातील एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर


8. हिंगोलीत फटाक्याच्या नादात 9 वर्षीय मुलानं डोळा गमावला, तर सुरतमध्ये गटारावर फटाके वाजवताना अचानक आग लागली


9. रत्नागिरीत मासेमारी गेलेली बोट पाच दिवसांपासून बेपत्ता, ६ खलाशांसह बोट गायब असल्याची तक्रार, पोलीस-तटरक्षक दलाकडून शोध


10. टी-20 विश्वचषकात टीम इंडियाची आज न्यूझीलंडशी निर्णायक लढत, भुवनेश्वर कुमार किंवा हार्दिक पांड्याऐवजी शार्दूल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता