दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागू, जाहीर कार्यक्रम, लग्नसोहळ्यात केवळ 50 जणांनाच परवानगी, तर अंत्यविधींना 20 जणांनाच जाता येणार


2. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत धडकी भरवणारी वाढ, काल दिवसभरात 5 हजार 338 नवे रुग्ण, तर एकट्या मुंबईत 3 हजार 928 जण पॉझिटिव्ह, 194 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग


3. ओमायक्रॉनच्या सावटाखालीही नववर्ष स्वागताची तयारी, कोकण, महाबळेश्वरसह पर्यटनस्थळं फुलली, नववर्ष पार्ट्यांवर पोलिसांची नजर


4. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची आज मतमोजणी, वर्चस्वासाठी राणेंची प्रतिष्ठा पणाला, तर नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम, आज हायकोर्टाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता 


5. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून हायअलर्ट जारी, मुंबईतल्या प्रमुख स्टेशनवरची सुरक्षा वाढली, सुरक्षेच्या कारणात्सव मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 31 डिसेंबर 2021 : शुक्रवार



6. एमपीएससी परीक्षेवरून आयोगावर टीका केल्यास परीक्षणार्थींवर कठोर कारवाईचा इशारा, एमपीएससीच्या फतव्याविरोधात उमेदवारांमध्ये संताप


एमपीएससीच्या या सगळ्या सावळ्या गोंधळामुळे स्वप्नील नावाच्या एका परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.  वेळेवर परीक्षा न घेणे,  एकच एमपीएससी सदस्य नियुक्त असल्यामुळे विविध परीक्षांच्या वेळेवर मुलाखती न होणे, यूपीएससीच्या धर्तीवर अनुकरण आणि आधुनिकीकरण न करणे, सरकारी अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी नवीन पद्धतीचा अवलंब न करणे या गोष्टी कारणीभूत आहेत. एमपीएससी संविधानात्मक संस्था असून देखील राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराची शिकार होते .


यूपीएससीला जे जमतं ते एमपीएससीला का जमत नाही? वेगवेगळ्या डिफेन्सच्या परीक्षा होतात, त्या यंत्रणेला जमतं ते एमपीएससीला का जमत नाही? सरकार आणि एमपीएससी विद्यार्थ्यांच्या जीवाशी कुठपर्यंत खेळणार आहे?  विधानसभेत सांगून सुद्धा जर वचनाची पूर्तता होत नसेल तर त्या नेत्यांवर हक्कभंग नका आणू नये? हे सगळे प्रश्न आता रात्रीचा दिवस करुन एमपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे मुलं विचारत आहेत.


7. कोरोनाचं संकट वाढतंय अन् डॉक्टर संपावर! मार्ड डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप


8. ओबीसी आरक्षणाशिवाय 18 महापालिकांच्या निवडणुका होणार? राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरू


9. आयकर रिटर्न्स दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस, आयकर विभागाकडून अजून तरी मुदतवाढ नाही


10. सेन्च्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर टीम इंडियाचा दणदणीत विजय,पाचव्या दिवशी उपाहारानंतर विजयाला गवसणी, टीम इंडियाची 1-0 अशी आघाडी