देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये


1. मुंबईत 9 मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश, मोर्चा काढणे, बॅण्ड वाजवणे, फटाके फोडण्यावर बंदी, दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून सतर्कता


2. मुस्लीम आरक्षण ओबीसीसह मराठा आरक्षणासाठी धोकादायक, देवेंद्र फडणवीसांकडून भीती व्यक्त, मुस्लीम आरक्षणासाठी ठाकरे सरकार अध्यादेश काढणार

3. मुंबई एपीएमसीत आज महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना, 18 संचालकपदासाठी मतदानाला सुरुवात, 58 उमेदवार रिंगणात तर 2 मार्च रोजी निकाल

4. अकोला मुली बेपत्ता प्रकरणी अकोला पोलीस अधीक्षक अमोघ गावकरांची बदली, तर दोन तपास अधिकाऱ्यांचं निलंबन, माझाच्या बातमीनंतर गृहमंत्र्यांची कारवाई

5. 2016 मध्ये दिल्लीतील जेएनयूमध्ये कथित देशविरोधी घोषणांप्रकरणी कन्हैया कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार, दिल्ली सरकारकडून खटला चालवण्यासाठी परवानगी

6. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीनंतरही रस्त्यावरील खड्डा बुजवला नाही तर तीन दिवसात चौकशी करुन गुन्हा दाखल करावा, औरंगाबाद खंडपीठाचा पोलिसांना आदेश

7. विदर्भात आज आणि उद्या गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता, तर मराठवाड्यात हलक्या सरी, हवामान खात्याचा अंदाज

8. आर्थिक मंदीच्या सावटातही खासगी बँकांमध्ये यंदा मोठी कर्मचारी भरती होणार, कोटक महिंद्रा, एचडीएफसी, अ‍ॅक्सिससह आरबीएलमध्ये एक लाख लोकांना रोजगार मिळण्याचा अंदाज

9. जागतिक अर्थव्यवस्थेला कोरोना व्हायरसचा फटका, भीतीमुळे परदेशवारींचं बुकिंग कॅन्सल, हज यात्रेकरुही परत, सोनंही महागण्याची शक्यता

10. ट्वेन्टी 20 महिला क्रिकेट विश्वचषकात भारत आणि श्रीलंका आमनेसामने, साखळीत सलग तीन सामने जिंकून भारताचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म