स्मार्ट बुलेटिन | 28 जुलै 2019 | रविवार | एबीपी माझा

1. भाजपकडून सत्तेचा गैरवापर, मात्र उत्तर कसं द्यायचं हे आम्हाला माहित आहे, राष्ट्रवादीतील आऊटगोईंगवर शरद पवारांची प्रतिक्रिया

2. काश्मीरप्रश्नी पाकिस्तान सुरुवातीपासूनच खोटारडेपणाने वागत आला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

3. मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात आजही मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातही पावसाचा अंदाज

4. मुसळधार पावसाचा रेल्वे प्रवाशांना फटका, गोदावरी एक्स्प्रेस, राज्यराणी आणि मुंबई-भुसावळ या गाड्या आज रद्द

5. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील दरड हटवली, 17 तासानंतर मातीचा ढिगारा बाजूला करण्यात यश, वाहतूक सुरु


6. वांगणीत महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची सुटका, तर कल्याणमध्ये पेट्रोलपंपाच्या छतावर अडकलेल्यांनाही एनडीआरएफनं वाचवलं

7. जुगार खेळताना पोलिसांनी छापा टाकल्याने चौघांच्या नाल्यात उड्या, दोघांचा मृत्यू, नागपूरच्या बहादुरा गावातील घटना

8. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचं निधन, यूपीएच्या कार्यकाळात दोन वेळा कॅबिनेट मंत्रिपद भूषवलं

9. संपत्ती जप्तीविरोधात विजय माल्ल्याची सुप्रीम कोर्टात धाव, आपल्यासह नातेवाईकांच्या संपत्ती जप्तीवर रोक आणण्याची माल्ल्याची कोर्टाला याचना

10. भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढली, अत्याधुनिक लढाऊ अपाचे हेलिकॉप्टर वायुसेनेच्या ताफ्यात दाखल