Smart Bulletin : एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन : 25 सप्टेंबर 2021 : शनिवार : ABP Majha
- महाराष्ट्रात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार, ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरात आठवी ते बारावीचे वर्ग भरणार, जिल्हाधिकारी-मनपा आयुक्तांना निर्णयाचे अधिकार
- घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं सुरू होणार, कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असल्यानं मुख्यमंत्र्यांचा निर्णय, नाट्यगृहसुद्धा होणार अनलॉक
- राज्यात शुक्रवारी 3,286 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 51 जणांचा मृत्यू
- आज आणि उद्या होणारी आरोग्य विभागाची भरती परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यांचा संताप, आरोग्य मंत्र्यांकडून परीक्षेसाठी नियुक्त खासगी कंपनीवर खापर
- UPSC च्या परीक्षेचा निकाल जाहीर, शुभम कुमार देशात पहिला, महाराष्ट्रातल्या 100 हून अधिक विद्यार्थ्यांची यशाला गवसणी
- लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी नागपूर महापालिकेची आयडिया, 100 टक्के लसीकरणाचं टार्गेट पूर्ण करणाऱ्या नगरसेवकांना जास्त विकास निधी मिळणार
- खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी एबीपी माझाची मोहीम, येत्या 8 दिवसात ठाणे खड्डेमुक्त होणार असल्याचं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
- दहशतवादाविरोधात एकत्र लढण्याची गरज, मोदी आणि बायडेन यांच्या भेटीदरम्यान निर्धार, पंतप्रधान मोदींचं आज संयुक्त महासंघाच्या सभेत संबोधन
- काल दिल्लीच्या रोहिणी कोर्ट परिसरात गँगस्टरची गोळ्या घालून हत्या, वकिलाच्या वेशात आलेल्या शूटर्सचंही एन्काऊंटर
- आयपीएलमध्ये काल आरसीबीचा सलग दुसरा पराभव, बंगळुरूला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्स गुणतालिकेत अव्वल