स्मार्ट बुलेटिन | 25 मार्च 2020 | बुधवार | एबीपी माझा


1. कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा, मुंबई, पुणे, नागपूरसह संपूर्ण राज्यातून प्रतिसाद

2. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे स्पष्टीकरण, घाबरु नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

3. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 107 वर, देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 536 वर, राज्यातील पहिल्या कोरोना बाधित दाम्पत्याला आज डिस्चार्ज मिळणार

4. जगभरात कोरोना महामारीचं थैमान, इटलीमध्ये गेल्या 24 तासात 700 हून अधिक जणांचा मृत्यू तर अमेरिका कोरोनांचं नवं केंद्र बनण्याची भीती

5. सरकारी रुग्णालयात मास्कचा तुटवडा; एक मास्क चार दिवस वापरण्याची डॉक्टरांवर नामुश्की, केंद्रीय मार्ड संघटनेची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे माहिती

6. मुंबईत घरीच होणार कोरोनाची चाचणी; पाच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांच्या सुविधा उपलब्ध

7. सोलापूर आणि सांगलीमध्ये भाजी खरेदीसाठी आजही गर्दी, एबीपी माझाच्या बातमीनंतर सोलापुरातील गर्दी पोलिसांनी हटवली

8. कोरोनावर विजय मिळवण्याचा संकल्प करूया, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरसंघचालक मोहन भागवतांचं संबोधन, सरकारच्या सूचनांचे पालन करण्याचंही आवाहन

9. चीनच्या हुबेई प्रांतातील 23 जानेवारीपासून सुरू असलेलं लॉकडाऊन आज हटणार, ट्रेन, बस, मेट्रो स्थानकं निर्जंतूक करण्याचं काम सुरू

10. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोक्यो ऑलिम्पिक रद्द, एक वर्षाने आयोजन; जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची माहिती