राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये


1. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं दीर्घ आजाराने निधन, अमित शाह, सोनिया गांधींसह सर्वपक्षीय नेत्यांनी घेतलं अंत्यदर्शन, आज दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार

2. विधानसभेला शिवसेना-भाजपात एकमेकांच्या सिटींग जागांवर चर्चा नाहीच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं विधान, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

3. परळी, केजचा आमदार राष्ट्रवादीचा होईपर्यंत बीड जिल्ह्यात फेटा बांधणार नाही, बीडमधील कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हेंचा निर्धार

4. एकनाथ खडसे राज्यात राहणार की केंद्रात जाणार, हे केंद्रीय नेतृत्व ठरवणार, भुसावळमध्ये खडसेंच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा सावध पवित्रा

5. काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य नाही, राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, श्रीनगरमध्ये अडवणुकीनंतर राहुल गांधी आणि विरोधी पक्षांचे नेते दिल्लीला परतले



6. यूएईच्या सर्वोच्च पुरस्कारानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान, यूएईच्या राजाकडून मोदींचा ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कारानं गौरव

7. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक, मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदर आणि हार्बर मार्गावर अंधेरी स्थानकात ब्लॉक

8. दहीहंडी फोडताना 140 गोविंदा जखमी, एकाचा मृत्यू, पूरस्थिती, आगामी निवडणुका आणि आर्थिक मंदीची दहीहंडीलाही झळ

9. इंदापूरमध्ये वाळू माफिया बेलगाम, बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई करताना तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न

10. अँटिग्वा कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाला 260 धावांची आघाडी, इशांत शर्माची भेदक गोलंदाजी तर अजिंक्य रहाणे आणि विराटची नाबाद अर्धशतकं