1. मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणा, चौकशी सुरु 


Shivsena Corporator Yashwant Jadhav : मुंबई मनपातील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येत आहे. आयकर विभागाकडून यशवंत चव्हाणांच्या घरी छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत. तसेच, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणाकडून होणारी चौकशी, शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. 


2. रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनच्या 137 जणांचा मृत्यू, युक्रेनचे 70 लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचा रशियाचा दावा, तर, युद्धामुळे एक लाखांहून अधिक युक्रेनियन नागरिक बेघर


3. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात फोनवरुन चर्चा, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेबाबत चर्चा, संवादातून मार्ग काढण्याचा मोदींना विश्वास


4. बलाढ्य रशियासमोर युक्रेन एकाकी, नाटो देशांनी फिरवली पाठ, तर सैन्य पाठवणार नाही, जो बायडन यांचा मोठा निर्णय, रशियावर अमेरिकेकडून कठोर निर्बंध 


5. युक्रेनमध्ये रशियन फौजांची धडक, चेर्नोबिल अणू प्रकल्पाचा घेतला ताबा; जगाच्या चिंतेत भर 


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 25 फेब्रुवारी 2022 : शुक्रवार



6. एसटी संपाबाबत आज हायकोर्टात सुनावणी,  विलीनिकरणाचा मुद्दा सोडून सर्व मागण्या मान्य केल्याची सरकारने सादर केलेल्या अहवालात माहिती


7. बारावी बोर्डाच्या दोन पेपरची तारीख बदलली, 5 मार्चला होणारा हिंदीचा पेपर 5 एप्रिलला तर 7 मार्चला होणारा मराठीचा पेपर 7 एप्रिलला होणार


8. संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊतांच्या संबंधित दोन जणांवर ईडीची धाड, दिल्लीची ईडी टीम ठाणे आणि रायगडमध्ये


9. राज्याच्या अनेक भागात उन्हाचा कडाका वाढला, रात्रीचा गारवाही घटला, उन्हाच्या झळा पुढील 4 दिवस कायम राहण्याचा अंदाज


10.  पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाची श्रीलंकेवर 62 धावांनी मात, ईशान किशन आणि श्रेयस अय्यरची खणखणीत अर्धशतकं तर भुवनेश्वर, वेंकटेशचा प्रभावी मारा