स्मार्ट बुलेटिन | 22 मार्च 2020 | रविवार | एबीपी माझा

1. मुंबईतल्या रस्त्यावर सन्नाटा, जनता कर्फ्युला नागरिकांचा प्रतिसाद, मेट्रोची सेवा बंद, लोकलमध्येही अत्यावश्यक सेवेतील लोकांना प्रवेश

2. पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही लोक घरात, दुकानं बंद, रस्त्यावरही शुकशुकाट, सोसायट्यांमध्येही विशेष खबरदारी

3. नमाज अदा करण्यासाठी मशिदीत येऊ नका, औरंगाबादेत मौलानांचं आवाहन, उर्वरित महाराष्ट्रातही लोकांची घरात बसून पसंदी

4. जिथे आहात तिथेच थांबा, प्रवास करून जीव धोक्यात घालू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीटद्वारे जनतेला आवाहन

5. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 64 वर, तर देशात एकूण 300 हून अधिक कोरोनाचे रुग्ण

6. आपात्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयात कोरोना नियंत्रण कक्ष, आरोग्यविषयक आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज

7. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय, 31 मार्चपर्यंत लोकलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच प्रवेश, ओळखपत्र तपासली जाणार

8. चीन आणि इटलीनंतर स्पेनमध्ये कोरोनामुळे मृत्यूचं तांडव, एकाच दिवसात 5 हजार नवे रुग्ण, तर इटलीत गेल्या 24 तासात 800 बळी

9. होम कॉरंटाईनच्या सूचना देऊनही स्थलांतर कराल तर खबरदार, कायदेशीर कारवाई होणार, राज्य सरकारचे निर्देश

10. कोरोनामुळे संसदेचं अधिवेशन स्थगित होण्याची शक्यता, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी खासदारांचा दबाव