एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन 21 सप्टेंबर 2021





  1. 31 डिसेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई होणार, किरीट सोमय्यांचा इशारा तर पुढचं टार्गेट थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री


  2. महापालिका निवडणुकांसाठी मनसेची जोरदार तयारी, आजपासून अमित ठाकरे तर उद्यापासून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर


  3. आजपासून तीन दिवस मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी


  4. सामूहिक बलात्कार झालेल्या परभणीतील 16 वर्षीय पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू, दोन आरोपींना बेड्या तर तिसरा आरोपी ताब्यात


  5. निकृष्ट बांधकामामुळे तीनमजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, जळगावच्या पाचोऱ्यातील घटना, रिकामी इमारत असल्यानं सुदैवानं जीवितहानी नाही


  6. पॉर्न फिल्मप्रकरणी उद्योगपती राज कुंद्राला जामीन, दोन महिन्यानंतर जेलमधून आज बाहेर येणार, तपासात सहकार्य करण्याचे कोर्टाकडून निर्देश


  7. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू, हत्या की आत्महत्येच्या वादात संपत्तीचा मुद्दा समोर, सुसाईड नोटमधील शिष्य आनंद गिरीला अटक


  8. आज मुंबईत 316 पैकी केवळ 73 सरकारी आणि सार्वजनिक लसीकरण केंद्र सुरु राहणार, मर्यादित लससाठ्याअभावी निर्णय


  9. पुढील महिन्यापासून भारत पुन्हा इतर देशांना लसी पुरवणार, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची माहिती


  10. आयपीएलची सुरुवात बंगळुरूसाठी निराशाजनक, कोलकाता नाईट राडर्सचा बंगळुरुवर नऊ विकेट्सने विजय