1. राज्यात 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान कोरोना रुग्णांमध्ये स्पाईक येण्याचा तज्ज्ञांचा अंदाज, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती, कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचंही आवाहन


2. राज्यात 466 नव्या रुग्णांची भर; कोरोनाबाधितांचा आकडा 4666 वर, सर्वाधिक 3032 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत, तर देशात एकूण 17656 कोरोनाचे रुग्ण


3. जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 25 लाखांच्या घरात, आतापर्यंत 1 लाख 70 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अमेरिकेत सर्वाधिक 42 हजार 514 जणांचा बळी


4. सांगलीकरांनी करुन दाखवलं, जिल्ह्यातील शेवटचा रुग्णही कोरोनामुक्त, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील 15 जण निगेटिव्ह


5. कोरोना पॉझिटिव्ह महिलेची यशस्वी प्रसुती; बाळाच्या जन्मानंतर आईची कोरोनावरही मात, 15 दिवसांच्या उपचारांनंतर नवी मुंबईच्या वाशीमधील महिलेला डिस्चार्ज


6. औरंगाबाद पोलीस आयुक्तालय भाग वगळता संपूर्ण जिल्हा बंद, केवळ मेडिकल सुरु राहणार, औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा निर्णय


7. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपाल कोट्यातून आमदारकी देण्याविरोधात हायकोर्टात याचिका, मात्र राज्यपालांच्या अधिकारातील निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार


8. अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण, लॉकडाऊनमुळे कच्च्या तेलाच्या किंमती शून्याखाली, एका बॅरलचा दर उणे 38 डॉलर


9. समाजकंटकांनी थुंकी लावून पैसे टाकल्याची अफवा, पालघरमधल्या कुडण गावात रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या पैशांनी नागरिक भयभीत, पोलिसांकडून पैसे ताब्यात


10. घरी बसून कंटाळा आला म्हणून नदीवर पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू, रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील वघिवरे गावातील घटना