1. रात्रभर हायव्होलटेज ड्रामा, हसन मुश्रीफांविरोधात आक्रमक झालेले किरीट सोमय्या पोलिसांच्या विनंतीनंतर माघारी परतणार, सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद 


2. ठाकरे सरकार मला घाबरलंय, किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल, दोन दिवसांनी पुन्हा एकदा कोल्हापुरात जाण्याचा निर्धार 


3. कोल्हापुरात मुश्रीफ समर्थक आणि भाजप समर्थक संघर्ष तूर्तास टळला, सोमय्या माघारी परतल्यामुळे राष्ट्रवादीचा कागरमधील मोर्चा स्थगित 


4. राज्यभरात पावसाची कोसळधार; मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, हवामान विभागाकडून मुसळधार पावसाची शक्यता


5. राज्यात काल  3413 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 8326  रुग्ण कोरोनामुक्त, राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर 


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन : 20 सप्टेंबर 2021 सोमवार ABP Majha



6. जावेद अख्तर बदनामी प्रकरणी आज अंधेरी कोर्टात सुनावणी, अभिनेत्री कंगना रानौत हजर राहणार का? याकडे लक्ष, सुनावणीला गैरहजर राहिल्यास कंगनाविरोधात अटक वॉरंट 


7. पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज किला कोर्टात सुनावणी, कोर्टाच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष 


8. पंजाबमध्ये काँग्रेसचं धक्कातंत्र, चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री, निवडणुकींच्या तोंडावर काँग्रेसकडून पहिल्यांदाच मागासवर्गीय चेहऱ्याला संधी 


9. मुंबईच्या वर्सोवा बिचवर गणपती विसर्जनासाठी गेलेले 5 जण बुडाले, दोघांना वाचवलं, तिघांचा शोध अजूनही सुरु 


10. कोहलीचा आरसीबीला 'विराट' धक्का; आयपीएल 2021 च्या उत्तरार्धानंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडणार