देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1.राज्य सरकारकडून कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, 2 लाख 97 हजार 907 शेतकरी ठरले लाभार्थी, उद्यापासून खात्यात पैसे जमा होणार

2. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना आज भूमिका स्पष्ट करणार, विनायक राऊत, उदय सामंत उपस्थित राहणार, तर उद्या नाणार समर्थकांची राजापुरात सभा

3. एबीपी माझानं उजेडात आणलेल्या ऑनलाईन शस्त्रविक्री प्रकरणाची गृहमंत्र्यांकडून दखल, अनिल देशमुखांचे कठोर कारवाईचे आदेश

4. राज ठाकरेंची मनसे तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार, शिवजयंतीसाठी 12 मार्चला राज ठाकरे औरंगाबादेत, निवडणुकीच्या तोंडावर सेनेला शह देण्याचा प्रयत्न

5. मुंबईत आजपासून पुन्हा प्लास्टिकबंदीची मोहीम, दुकानांसह मंगल कार्यालय, उपहारगृहांची होणार कसून तपासणी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे आदेश

6. गिरणी कामगारांच्या 3 हजार 894 घरांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज सोडत, तीन मिलमधील 17 हजार गिरणी कामगारांचा सोडतीत समावेश

7. मुंबई महापालिका आयुक्तांना परवानगीशिवाय एकही झाड तोडता येणार नाही, शिवसेनेकडून आयुक्तांच्या अधिकारावर कुऱ्हाड, एकमतानं ठराव मंजूर

8. 11 ते 13 मार्चदरम्यान सार्वजनिक बँकांनी पुकारलेला संप मागे, ग्राहकांनी सोडला सुटकेचा निश्वास, संप आणि सलगच्या सुट्ट्यांमुळं 6 दिवस व्यवहार ठप्प राहणार होते

9. देऊळ चित्रपटाच्या कथेप्रमाणे अमरावतीत भक्तीचा बाजार, मोहाच्या झाडाखाली शंकर-पार्वती अवतरल्याची चर्चा, दर्शनासाठी पंचक्रोशी लोटली

10. पाकिस्तानमध्ये गूगल, फेसबुक, ट्विटर, युट्यूब, टिकटॉकची सेवा बंद होण्याची शक्यता, इम्रान सरकारच्या नवीन निर्णयाचा फटका