महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.



एबीपी माझा Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 19 ऑक्टोबर 2021 मंगळवार : ABP Majha


1. CBSE बोर्डाकडून दहावी, बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पहिल्या सत्राची परीक्षा, कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा दुप्पट परीक्षा केंद्र


2. राज्यातल्या हॉटेल्स आणि दुकानांच्या वेळा वाढवणार, मुंबईत रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी, तर २२ ऑक्टोबरपासून थिएटर्सबरोबर अॅम्युझमेंट पार्कही सुरु होणार


3. मराठी भाषेत पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ, मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी नगरविकासमंत्र्यांची घोषणा


4. जिल्हा नियोजनाच्या बैठकीत आमदार रवी राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी, शेतकऱ्यांच्या मदतीवरुन वाद


5. यंदा ईदनिमित्त मिरवणुका काढण्यास परवानगी, कोरोनाचे नियम पाळणं बंधनकारक


 


पाहा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटिनचा आढावा व्हिडीओतून



 


6. डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री पद नाकारलं,जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण


7. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये ८ दिवसांपासून चकमक सुरुच, आतापर्यंत ९ जवान शहीद, स्थानिकांवरही हल्ले होत असल्यानं परप्रांतीयांकडून काश्मीरचा उंबरठा ओलांडण्यात सुरुवात


8. बांग्लादेशातल्या रंगपूरमध्ये हिंदू वस्तीवर हल्ला, मंदिरांची तोडफोड करत ६६ घरं जाळली, जगभरातून निषेध


9. राज्यातील साखर कारखानदारीच्या मुद्द्यावर आज देवेंद्र फडणवीस अमित शाहांना भेटणार


10. कोरोनाचा विळखा आणखी सैल, राज्यात काल दिवसभरात 1485 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद