स्मार्ट बुलेटिन | 19 जुलै 2021 | शुक्रवार | एबीपी माझा

पावसाचं धुमशान सुरुच, कोकणात अतिवृष्टीची शक्यता, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

आषाढी वारीसाठी मानाच्या पालख्यांचं पंढरीकडे प्रस्थान, एसटी बसद्वारे पालख्या पंढरीला पोहोचणार

आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, शेतकरी आंदोलनासह अनेक विषयांवर वादळी चर्चा होणार
 




भांडूप पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचं काम सुरुच, पाणी उकळून पिण्याचं मुंबईकरांना आवाहन

नाशिकमध्ये मंदिरं बंद असतानाही मंदिर उघडून जितेंद्र आव्हाडांकडून पूजा, गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ नाही, पेट्रोलच्या दरांमध्ये मे महिन्यापासून 41 वेळा वाढ झाली


पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू, चार कार्यकारी अध्यक्षांचीही निवड

राज्यात रविवारी नऊ हजार कोरोना रुग्णांची भर तर 5, 756 रुग्णांना डिस्चार्ज


नंदुरबार जिल्ह्यात गाडी दरीत कोसळून भीषण अपघात, आठ जणांचा मृत्यू

भारताचा श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय, शिखर धवन विजयाचा शिल्पकार