- पुणे-सोलापूर रस्त्यावर कारचा भीषण अपघात, पुण्यातल्या 9 महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू, रायगडवरुन परत येत असताना काळाचा घाला
- चुनारच्या गेस्ट हाऊसमध्ये प्रियांका गांधीचं दुसऱ्या दिवशीही धरणे आंदोलन, अंधारात रात्र काढल्याचा काँग्रेसचा दावा, सोनभद्र हिंसाचारावरुन राजकारण तापलं
- मुंबईत सर्वच्या सर्व जागा जिंकू, मुख्यमंत्र्यांचा निर्धार, शिवसेनेसोबत युतीचेही स्पष्ट संकेत
- जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा कुठलाही वाद नाही, शिवसेना-भाजप जुळे भाऊ असल्याचं संजय राऊत यांचं प्रतिपादन
- शाळा दूर असल्यास वाहतूक भत्ता मिळणार, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून दिलासा
- मोठ्या प्रतिक्षेनंतर औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी, बळीराजाला तात्पुरता दिलासा, सिंधुदुर्गातही मुसळधार पाऊस
- हिंगोलीतील वसमत तालुक्यात वीज कोसळून दोन महिलांसह तिघांचा मृत्यू, घटनेने जिल्ह्यात हळहळ
- कल्याणमध्ये तरुणीची हत्या करत तरुणाची आत्महत्या, प्रेमसंबंधातून घटना घडल्याचा अंदाज
- राज्यपालांच्या आदेशानंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी सुप्रीम कोर्टात, कर्नाटक विधानसभा सोमवारपर्यंत तहकूब
- वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड उद्या होणार; महेंद्रसिंग धोनी विंडीज दौऱ्यावर जाणार की नाही याकडे लक्ष