1. मध्यरात्री गुजरातच्या सौराष्ट्रात तोक्ते चक्रीवादळ धडकलं, तीव्रताही कमी झाल्याची माहिती; रायगड, मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता 


2. सलग दुसऱ्या वर्षी वादळाचा तडाखा सोसणाऱ्या कोकणाचं मोठं नुकसान, हजारो घरांची पडझड; अनेकांच्या बागा आणि बोटी उद्ध्वस्थ 


3. पश्चिम महाराष्ट्रालाही तोक्ते चक्रीवादळाचा फटका, साताऱ्यात घरांवरील पत्रे उडाले, कोल्हापुरात पिकांचं नुकसान, तर नाशिकच्या आदिवासी पाड्यांचंही नुकसान


4. मुंबईच्या समुद्रात भरकटलेल्या दोन जहाजांच्या मदतीसाठी भारतीय नौदलाच्या नौकांची धाव, गुजरातच्या 22 मच्छिमारांसाठी मुंबई पोलीस ठरले देवदूत 


5. कोरोनाच्या ब्रिटन आणि भारतातील सर्व स्ट्रेनवर कोवॅक्सिन प्रभावी भारत बायोटेकचा दावा, प्रसिद्ध मेडिकल जर्नलमधील संशोधनाचा दाखला


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 मे 2021 | मंगळवार | ABP Majha



6. प्रौढ वयोगटातील रुग्णांवरील कोविड उपचारांमधून प्लाझ्मा थेरपी वगळा; आयसीएमआरचे निर्देश


7. प्रत्यक्षात 5 लाखांची गरज असताना महाराष्ट्राला मिळाले 2 लाख लसीचे डोस, गेल्या काही दिवसांपासून ब्रेक लागलेलं लसीकरण पुन्हा सुरु होण्याची चिन्ह 


8. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह 


9. पुढच्या सहा आठवड्यांत अमेरिका इतर देशांना आठ कोटी लसींचा पुरवठा करणार, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची मोठी घोषणा


10. फरार पैलवान सुशील कुमारवर दिल्ली पोलिसांकडून एक लाखांचं इनाम, पैलवान सागर धनकडच्या हत्येचा सुशीलवर आरोप