Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 जुलै 2021 रविवार | ABP Majha


1. रात्रभर झालेल्या मुसळधारेनंतर मुंबईत पावसाची उसंत, सखल भागात साचलेलं पाणी ओसरण्यास सुरुवात, हवामान खात्याकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट


2. मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला तडाखा, ठाणे-सीएसएमटी दरम्यानची लोकल, एक्स्प्रेस वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत ठप्प


3. बीडमध्ये ममदापूर-पाटोदा शिवारात एसटी चालकांचं जीवघेणं धाडस, पूल पाण्याखाली गेलेला असतानाही एसटी चालवली


4. पवारांच्या आशीर्वादामुळं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचा सेनेला टोला तर राष्ट्रवादी कुणामुळे सत्तेत, शिवसेनेचा प्रतिटोला


5. आषाढीच्या पार्श्वभूमीवर आजपासून पंढरपूरसह 10 गावात आठवडाभर संचारबंदी, शहरात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त


 



6. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी, शनिवार, रविवारी दुकानं बंद राहणार


7. सध्याच्या वेगानं पूर्ण मुंबईचं लसीकरण व्हायला 3-4 वर्ष लागतील, मुंबईतील अपुऱ्या लस पुरवठ्यासंदर्भात एका शिक्षकाची हायकोर्टात याचिका


8. काळाच्या जबड्यातून वाचवले लेकीचे प्राण, पोटच्या गोळ्यासाठी आईची वाघाशी झुंज, चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना गावातील घटना


9. रत्नागिरी जिल्ह्यातील कोंडिवरे गावात पुराच्या पाण्यात रंगला बचावाचा थरार, तब्बल पाच तासानंतर 83 वर्षीय आजोबांची सुटका


10. ब्रिटनमध्ये तिसऱ्या लाटेचं थैमान, एका दिवसात 50 हजारांहून अधिक रुग्ण, भारतानं अधिक दक्ष राहण्याची गरज