एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन 17 सप्टेंबर 2019

  1. मराठवाडा मुक्ती संग्राम ध्वजारोहणाला एमआयएचे खासदार इम्तियाझ जलिल यांची दांडी, सलग चार वर्ष गैरहजर राहणाऱ्या जलील यांच्यावर टीका


 

  1. विधानसभेसाठी भाजपची 288 जागांवर चाचपणी, नाशिकमध्ये गिरीश महाजनांचं विधान, शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा देताना युती होणार असल्याचाही पुनरुच्चार


 

  1. नाणारचं झालं तेचं आरेचं होईल, विधानसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंकडून भाजपवर दबावतंत्र, तर कारशेडसाठी आरेला पर्याय नाही, अश्विनी भिडेंची स्पष्टोक्ती


 

  1. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज कोल्हापूरमार्गे कोकणात, कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांविरोधात बॅनरबाजी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन


 

  1. राजकारणात जातीचं कार्ड समोर करणाऱ्यांना नितीन गडकरींनी सुनावले खडे बोल, फक्त आरक्षणातून विकास होत नसल्यांचही वक्तव्य


 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 69 वा वाढदिवस, देश-विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव, थोड्याच वेळात आईची भेट घेणार


 

  1. अमित शाहांच्या 'एक राष्ट्र एक भाषे'बाबतच्या वक्तव्यानंतर कमल हासन यांची संतप्त प्रतिक्रिया, दक्षिणेतील राजकीय पक्ष आंदोलनाच्या तयारीत


 

  1. अन्यायाची समज यायला उदयनराजेंना 15 वर्ष लागली, नाशिकमधील पत्रकार परिषदेत शरद पवारांचा उदयनराजे भोसलेंना टोला


 

  1. मुंबईच्या तुंबईवर जपानी तंत्र अंमलात आणण्याचा विचार, जलबोगद्यात पाणी साठवून समुद्रात सोडण्याचे तंत्र, जपानी तंत्रज्ज्ञ मुंबईचा दौरा करणार


 

  1. लालबागच्या राजाच्या चरणी सहा कोटींची रोकड तर चार किलो सोन्याचं दान, अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरात गर्दी