स्मार्ट बुलेटिन | 17 जुलै 2021 | शनिवार | एबीपी माझा



  1. पुढचे 100 दिवस सतर्क राहा, तिसऱ्या लाटेच्या पाश्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा इशारा, सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पंतप्रधानाकडूनही चिंता व्यक्त


  2. राज्यात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता कमीच, मंत्री विजय वडेट्टीवारांची माहिती, तर लोकलबाबत निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असल्याचं स्पष्टीकरण


 



  1. सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा, राज्य मंत्रिमंडळात फेरबदालचे संकेत

    4. रात्रीतून कुणाला अटक झाली तर प्रतिक्रिया देण्यासाठी मी नाशकातच आहे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्यात

    5. ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त, तर पंकजा मुंडेंचं वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ कारखान्याचं बँक खातं सील


 




  1. गृहविभागाप्रमाणं महावितरण विभागातही वसुलीचा प्रकार; मनसेचा दावा, कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा संदीप देशपांडेंचा आरोप


 



  1. राज ठाकरेंचा मावळा उद्धव ठाकरेंच्या दरबारात; महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर शिवसेनेत


 



  1. वर्ध्याचे केशव कोलते ठरले मानाचे वारकरी, मुख्यमंत्र्यांसोबत आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेत सहभागी होणार


 



  1. राज्याचा दहावीचा निकाल 99.95 टक्के, अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल, साडे सहा तासांच्या खोळंब्यानंतर वेबसाईट सुरु, खोळंब्याच्या चौकशीचे आदेश

  2. उस्मानाबादमध्ये सोयाबीनच्या पिकांवर गोगलगायींचा हल्ला, रात्रीच्या अंधारात पीकं फस्त, अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ