Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 ऑगस्ट 2021 | मंगळवार | ABP Majha




    1. अफगाणिस्तानातील परिस्थितीसाठी राष्ट्रपती अशरफ गनी जबाबदार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मौन सोडलं, सैन्य माघारी बोलावण्याच्या निर्णयावर बायडेन अजूनही ठाम

    2. दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका, तर पाकिस्तान आणि चीनचा तालिबानराजला पाठिंबा

    3. लॉर्डस कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय, इंग्लंडचा 151 धावांनी पराभव, भारताच्या वेगवान चौकडीसमोर इंग्लिश फलंदाजांचं लोटांगण

    4. जनआशीर्वाद यात्रेतून भाजपचं मिशन महापालिका; नारायण राणेंच्या खांद्यावर मुंबईची विशेष जबाबदारी, राणे अनेक प्रभागात भेटीगाठी घेणार

    5. मराठा-ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत हारतुरे आणि फेटा स्विकारणार नाही, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची घोषणा





  1. गेल्या काही दिवसांपासून दडी मारणारा पाऊस उद्यापासून बरसणार, हवामान विभागाचा अंदाज, शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे

  2. राज्यात डेल्टा प्लसचा वाढता संसर्ग, आतापर्यंत 76 रुग्णांची नोंद, कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे डोस घेतलेल्या 22 जणांना लागण

  3. शाळेसंदर्भाताला निर्णय रखडलेला असताना अल्पवयीन मुलांना मॉल्समध्ये प्रवेश देण्याचा निर्णय, वयाचा दाखला दाखवून मॉल्समध्ये प्रवेश देणार

  4. पर्यटकांसाठी महाबळेश्वर अनलॉक, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तर गणपतीपुळे पर्यटकांसाठी सुरु करण्याबाबत आज ग्रामपंचायतीची महत्त्वाची बैठक

  5. आईच्या 50 व्या वाढदिवशी मुलाकडून सरप्राईज गिफ्ट, आईला घडवली हेलिकॉप्टरची सफर, उल्हासनगरच्या तरुणाच्या मातृप्रेमाची सर्वत्र चर्चा